रामटेक :-दि.27 मार्च – नागपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे महायुती भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभे करता तिसऱ्यांदा नामांकन पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात, प्रचंड महा रॅली काढून नामांकन पत्र दाखल केला. त्याचप्रमाणे रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार राजूभाऊ पारवे यांनी नितीन गडकरी यांचे सोबतच आपला नाम निर्देशन पत्र जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सादर केला. *नेते, कार्यकर्ते,विशेषत्वाने मतदार सुद्धा प्रचंड संख्येने उपस्थित* संविधान चौक नागपूर येथे दोन्ही उमेदवारांच्या रॅलीसाठी नागपूर लोकसभा क्षेत्रातून तथा रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील रामटेक, उमरेड,कामठी, सावनेर,काटोल, हिंगणा येथून हजारो कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवून, विजयाची नांदी दिली. रणरणत्या उन्हामध्ये युवक, तरुण,आबावृद्ध , शेतकरी, शेतमजूर आपली हजेरी लावलेली होती. जिल्हाधिकारी कार्यालया परिसरातील रस्ते बंद करण्यात आलेले होते. रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे उमेदवार राजूभाऊ पारवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्र सादर केल्यानंतर दैनिक दिव्य व त्यांचे रामटेक पारशिवंनी,मौदा,तालुक्याचे संयोजक प्रतिनिधी एन. आर.रामेलवार यांना लोकांचे प्रेम व आज लोकांची प्रचंड उपस्थिती, हीच माझ्या विजयाची हॅट्रिक आहे असे त्यांनी सांगितले. नामांकन पत्र दाखल करताना उमेदवार नितीन गडकरी, राजूभाऊ पारवे, डॉक्टर राजीव पोतदार , जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. नामांकन भरण्याच्या रॅलीमध्ये अशोक धोटे, श्रीकांत देशपांडे, उपाध्यक्ष डॉ.राजेश ठाकरे संजय मुलमुले, माजी आमदार आशिष देशमुख, उमरेड चे इटकेलवार, आमदार टेकचंद सावरकर, हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे, भाजपाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते व हजारोच्या संख्येने मतदार उपस्थित होते.
नामांकन पत्र दाखल करताना नितीनजी गडकरी यांचे सोबत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रफुलपटेल,इत्यादी मान्यवर मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.