- सदर रस्ता नॅशनल हायवे 44 ला जोडणारा बायपास रस्ता असल्यामुळे दिवसभर जड वाहनांची वर्दळ असते. जड वाहनांचे ब्रेक कधीही अपडेट राहत नाही. ट्रक ड्रायव्हर रात्रंदिवस गाडी चालवीत असल्यामुळे,त्यांना झोपेची डूलकी येत असते. डुलकी आल्यानंतर सदर वाहन दुभाजकावरून दुकानदाराच्या अंगावरती गेल्यास फार मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. नेहरू मैदानात 365 दिवस खेळ किंवा सांस्कृतिक कार्यक्रम चालत नाही. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तथा खेळ स्पर्धा चे आयोजन आठवडी बाजाराचा रविवार दिवस सोडून करण्यात यावे. अधिकारी वर्गाला कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. असे असताना सुद्धा कुणाच्या म्हणण्यावरती निर्णय घेत असल्याने, मोठा अपघात झाल्यास त्या गोरगरीब दुकानदारांचा विमा कोण देणार आहेत? नगरपरिषद तथा कोणत्याही विभागाने त्यांचा विमा काढलेला आहे काय? कोणत्याही अधिकारी तथा नेत्यांनी त्यांचा विमा काढलेला आहे काय? कोणताही अधिकारी किंवा नेता त्यांना ते पैसे देणार आहेत काय? असा सवाल किरकोळ दुकानदार प्रशासन व शासनाला करीत आहेत. सदर आठवडी बाजार नेहरू मैदानावर न नेल्यास, भारतीय प्रगतिशील पत्रकार संघ रामटेक पुढचा पवित्रा घेणार आहे.
- कन्हान येथील आठवडी बाजार रस्त्यावर आहे. नगर पंचायतने ब्रुक बोंड कंपनीला आपली सरकारी जागा दिलेली होती. ब्रुक बोंड कंपनीने दुसऱ्यांना ती जागा विकली. कंपनीने ती जागा नगर पंचायतला परत करायला पाहिजे होती.
- जनतेचे कुणीही ऐकत नाही
- ज्या जनतेने ज्याला निवडून दिलेलं असते त्यांना सर्वपरी मानून त्यांचेच ऐकत असतात. मग मोठा अपघात झाल्यानंतर त्यांचेच ऐकून त्यांच्याकडूनच मोठी रक्कम घेऊन अपघात ग्रस्त कुटुंबाला देण्यात यावी.
- मनसर येथील आठवडी बाजार सरकारी जागेत व रोड वरती भरत असतो. तो बाजार सुद्धा सरकारी जागेत हलविण्याबाबत, शासन प्रशासन खाजगी जागा अधिग्रहण का करीत नाही व त्यांना त्यांचा मोबदला का देत नाही. सध्या मृत्यूचे प्रमाण हे अपघाताने वाढलेले असल्याने त्याची खबरदारी घेण्यात यावी. चुकीच्या निर्णयाने कुणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणत्याही अधिकारी व नेत्याला दिलेला नाही.
- भारतीय प्रगतिशील पत्रकार संघाचे अध्यक्ष नथुजी रामेलवार व संघाचे उपाध्यक्ष कार्तिक उ राडे, संघाचे सदस्य माजी नगरसेवक रामानंद अडामे, सिद्धांत टक्कामोरे, राहुल हटवार, अविनाश भोगे, सामाजिक कार्यकर्ते सागर गावंडे , सर्व किरकोळ दुकानदार रामटेक येथील नागरिक तथा तालुक्यातील किरकोळ दुकानदारांची तीव्र मागणी आहे आठवडी बाजार पूर्ववत नेहरू मैदानावर घेण्यात यावा, आशिष शासन, प्रशासनाला तीव्र मागणी आहे.
नेहरू मैदानावर आठवडी बाजार घेण्याची मागणी
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on