रामटेक येथील वैकुंठ धाम गौतम ऋषी तलावाजवळ*गौतम ऋषी मोक्षधामी अनेक असुविधा*
रामटेक -दि.22 मार्च — ऐतिहासिक व धार्मिक स्थळ असलेल्या रामटेकच्या, गौतम ऋषीच्या पावन भूमीत गौतम ऋषी मोक्षधामी अनेक असुविधा असून, विकास कामाची गती संथ गतीने आहे.
मोक्षधामी ठिकाणी पाण्याची बोरवेल खोदलेली आहे. बोरवेल चे पॉईंट अचूक ठिकाणी दिल्यामुळे, बोरवेल ला पाणी नसल्यासारखे आहे. त्यामुळे दुसरा पॉईंट, पाण्याची अचूक पॉईंट देणारे, किटस कॉलेजचे प्रोफेसर बोपचे सर किंवा अनेक पाण्याचे केंद्रबिंदू सोडणाऱ्या लोकांकडून, सर्वे करून पुनश्च पाण्याचा पॉईंट घेऊन बोरवेल करण्यात यावी.
*मोक्षधामी पाण्याने तुडुंब भरलेली विहीर*
मोक्षधामी पाण्याने तुडुंब भरलेली विहीर असून, त्यावर पंप लावून, वॉशरूम चे ठिकाणे व सुलभ शौचालयाचे ठिकाणी पाण्याची पाईपलाईन द्वारे पाणी देण्यात यावे. त्यामुळे अंतयात्रेला आलेल्या लोकांचे विधी व सर्व कार्यक्रम पार पडू शकतात.
मोक्षधामी लहान सभागृह बांधल्यामुळे, त्या ठिकाणी बांधकाम साहित्य ठेवल्यामुळे, सभागृहाला कुलूप नेहमी लावलेले असते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अंत यात्रेला लोकांना त्या सभागृहात बसावेसे वाटते. मात्र सभागृहाला लावलेला ताला खोलणार कोण? नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व प्रशासक यांनी तो ताला खोलून सभागृह लोकांच्या सोयीसाठी खुले करून देण्यात यावे.
*कडुलिंब आंबा बादाम ची झाडे सावलीसाठी लावणे आवश्यक*
प्रशस्त मोक्षधाम असल्यामुळे, त्या ठिकाणी कडुनिंब बादाम आंब्याची झाडे लावण्यात यावी अशी ही सुज्ञ नागरिकांची आहे.
*पूर्वेकडील पाण्याचे कुंड स्टेडियम सारखे हावे*
मृतकाच्या कुटुंबातील व्यक्तीला चितेला अग्नी देण्याआधी, राख विसर्जनाचे आधी आंघोळ करावी लागते. मोक्षदामाच्या पूर्वेला पाण्याच्या कुंडात पायऱ्या दिल्या गेल्या नसल्यामुळे, घसरून पडून मोठा अपघात किंवा पाण्यात डुबवून मृत्यू येण्याची शक्यता आहे. त्यासाठी चौकोनी पायऱ्या कुंडाभोवताल पूर्ण घेर देऊन, चार कोपऱ्यावरती, जमिनीच्या पृष्ठभागावर आंघोळीचे चबुतरे देण्यात यावे. कुंडात उतरण्यासाठी स्टीलची रेलिंग सभोवताल देण्यात यावी. किंवा त्या ठिकाणी नळ योजना देऊन, चारही आंघोळीच्या चबुतऱ्यावर नळाची व्यवस्था करण्यात यावी
*प्याऊ सारखे नळाची व्यवस्था करावी*
धर्मदाय संस्थेकडून किंवा नगरपरिषदेच्या रामटेक विकास आराखड्यांतर्गत प्याऊ ची व्यवस्था करून नऊ दहा नळ त्या ठिकाणी देण्यात यावे. प्रशस्त मैदान असल्यामुळे त्या ठिकाणी तिसरा दिवस इतर कार्यक्रम जनता घेऊ शकते.
*निसर्ग रम्य ठिकाणी, सुंदर मोक्षधाम, प्रशस्त मैदान व प्रशस्त हिरवीगार लोन*
निसर्ग रम्य ठिकाणी, समोर टेकडीची रांग, हिरवीगार झाडे, प्रशस्त हिरवेगार गवताचे लान असलेले हे मोक्षधाम सुंदर नियोजन करून नगर परिषदेने रामटेक विकास आराखड्यांतर्गत, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या कल्पकतेने, त्या प्रभागाचे नगरसेवक संजय बिसमोगरे, नगरसेविका धमगाये इत्यादींच्या पुढाकाराने प्रयत्नाने मूर्त रूप आलेले आहे. त्यातील उणीवा फक्त दूर करावयाचे आहेत.
*मोक्षधाम कडे जाणाऱ्या रस्त्यावरती स्ट्रीट लाईटची व्यवस्था करणे गरजेचे*
रात्रीच्या वेळी शेवयात्रा गेल्यास त्या रस्त्यावरती पूर्ण अंधार कुट्ट असतो. तसेच विसावा चबुतरा चुकीच्या पद्धतीने बांधल्यामुळे, लांबी व रुंदी त्याची वाढविण्यात यावी. बस स्थानकापासून मोक्षदामी जात असताना, डाव्या भागाकडील पांढरा विसावा चबुतरा, रस्त्याच्या खोल भागात असल्यामुळे, त्या ठिकाणी माती मुरूम फिलिंग करून काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी भारतीय प्रगतिशील पत्रकार संघ रामटेकची तीव्र मागणी आहे. त्याचप्रमाणे रामटेक मधील सर्व नागरिकांची तीव्र मागणी आहे.
रामटेक च्या गौतम ऋषि मोक्षधामी अनेक असुविधा
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on