खासदार कृपाल तुमाने यांनी विकास आणि जनसंपर्क तगडा ठेवला असता, शासनाकडे सतत कामाचा पाठपुरावा मागणी सुरूच ठेवली असती, कामे हो की न हो शासनाकडे संसदेत आवाज उठविला असता, तर त्यांचावर हा प्रसंग आज दिसला नसता. कोणत्याही नेत्याला निवडणूक लढवायची असेल, तर गुळाचा गणपती न राहता त्यांना हरणासारखे व बिबट्यासारखे धावावे लागते. अन्यथा तिकीट कटण्याची नामुष्की येऊन पडते. हा धडा आता प्रत्येक निवडणुकीत उभे राहणाऱ्या इच्छुक उमेदवारांना घ्यावयाचा आहे.
उमरेड चे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी कामाचा धडाका जोरदार ठेवल्यामुळे, तरुण तुर्क असल्यामुळे, काँग्रेसची तिकीट भेटत नसल्याचे जाणून त्यांनी, आपला पवित्र बदलून त्यांनी शिवसेना भाजपला जवळ केले. त्यांचे जवळ उमरेड विधानसभा मतदारसंघ असून, रामटेक, हिंगणा,कामठी असे चार विधानसभा क्षेत्र आहेत. हेच गणित भाजपा व शिंदे बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने जमविले. म्हणजे उमेदवाराच्या बाजूने चार विधानसभा असल्याने, काँग्रेसला मोठी शिरकत करावी लागणार आहे.
काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार रश्मीताई बर्वे यांच्या जात पडताळणी विषयी आक्षेप घेऊन, त्यांना ना उमेश करण्याचा जो पवित्र घेतलेला होता, तो असफल झाल्याने त्यांच्याही ग्राफ वाढलेला आहे. रामटेक चे माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या उमेदवारी वेळेस, अपक्ष त्यावेळेस चे उमेदवार एडवोकेट अशीच जयस्वाल यांनी त्यांच्या ठेकेदारी बद्दल आक्षेप कोर्टात टाकलेला होता. म्हणजे त्यांना डी मल्लिकार्जुन रेड्डी भारी वाटत होते. म्हणून रडीच्या खेळ खेळून त्यांनी कोर्टात टाकल्याने, उलट डी मल्लिकार्जुन रेड्डी चा ग्राफ वाढून ते विजयी झालेले होते. तसेच रश्मीताई बर्वे यांच्या विरुद्ध जाती पडताळणीचा आक्षेप घेऊन, ना उमेद जो प्रयत्न करण्यात आला, त्यामुळे त्यांची बाजू पूर्वीपेक्षा अधिक भक्कम झालेली आहे. मात्र त्यांचे कडे सावनेर विधानसभा व काटोलचे आमदार शरद पवार गटाचे माजी मंत्री अनिल देशमुख आहेत. सध्या तरी त्यांची अशी जमेची बाजू आहे.
*नागपूरच्या निवडणुकीपेक्षा रामटेक च्या लोकसभा निवडणुकीची चुरस*
नागपूर लोकसभा निवडणुकीपेक्षा रामटेकची निवडणूक अति चुरशीची असल्याने, लोकांचे आतापर्यंत उमेदवारी कोणाला मिळेल हाच एक विषय जो होता त्याला आता आज विराम बसलेला आहे. काँग्रेसच्या रश्मीताई व भाजपा शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे हे दोन्ही उमेदवार तरुण व काम विकास उमेदवार आहेत. आता मतदारांना कोण आपल्याकडे खेचून आणतो, विविध जातीच्या विविध पक्षाचे समर्थन कोण खेचून आणतो, वरिष्ठ नेत्यांच्या सभा कोण उमेदवार गाजवतो, मतदारांच्या दारापर्यंत कोण आपली पकड मजबूत करतो, यावर 19 एप्रिल चा निकाल अवलंबून आहे.
*आगे आगे देखो, आगे होता है क्या*
महाविकास आघाडीच्या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या उमेदवार रश्मी बर्वे गडमंदिरावरील प्रभू रामचंद्र चरणी प्रचाराचा नारळ आज दहा वाजता फोडणार
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on